तुझा पाऊस...
तुझा पाऊस...
राहशील
का असाच बरोबर
ह्या मुसळधार सरींनी भिजलेला
ओला असलास वरून तू
तरी आतून वाळलेला तू
पाण्यात भिजला असलास तरी तू
आतून दिसतोस तू कोरडा
पाण्याचा स्पर्श ओला करणारा
पाण्याच्या आत कोरडा राहणारा
पावसात चिंब चिंब भिजून होतोस तू ओला
बरसू दे त्या आनंदाचा पाऊस
अन् ही सायंकाळ कर तू नयनरम्य
आतून बाहेरून ओला पाऊस आठवणारा
तुझ्या कुशीत झोपी जावे ह्या पावसासारखे
हा आगळा-वेगळा अन्
मनाला सुखद धक्का देणारा
हा तुझ्या आठवणीतील पाऊस
पाऊस ! पाऊस ! पाऊस !