Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

तु चंद्रापरी आलीस...

तु चंद्रापरी आलीस...

1 min
184


ती रात्र अवसेची तु चंद्रापरी आलीस,

कांती तुझी पाहूनीया सखे विजही लाजली...

जमलेला पालापाचोळा ती रातकिड्यांची किर्रर,

तुझ्या पैंजणाच्या नादाने पक्षीही गुंग झाली ...

सोडवशील कसा तु पदर माझ्या मनात तो फसला,

लाजली कळी गुलाबाची नशा रात्रीला चढली ...

हलक्या हलक्या पावलांनी क्षण स्तब्ध होत आहे,

तुझ्या इथे येण्याने चांदण्यांची गुर्मी गेली ...

काय सांगु मी तुला काय? अघटीत हे घडले,

तु येताच श्वास रोखुन वृक्ष श्वास घ्यायची विसरली...

निघु नको ना तु अशी रात्री अपरात्री शोधात माझ्या,

तुला बघता सुचते कविता पण ती ओठावर आली...

ओढ हृदयाची माझ्या तु न पर्वा कुणाची केली ,

आलीस शोधत मला अशी जशी राधा यमुनातीरी गेली...


Rate this content
Log in