तत्व जीवनाचे...
तत्व जीवनाचे...
तत्वांचा राजा तत्वनिष्ठ आहे, जगाला सांगत फिरलो
आपल्याच मनातून स्वतः मात्र होरपळून गेलो
होती माझ्या ठायी मती दिग्विजयाची-परिवर्तनाची
धोंडा मारुनी स्वपरियाण, इतरांशी नातं जोडत गेलो
येते जाते वाहवा, डोक्यात चढली जेव्हा - तेव्हा
उठलो, धावलो, पडलो, सावरलो, परंतु कुणाचा न राहिलो
माझ्या वाट्याला आलेले दुःख न दाखविले कधी कुणा
मनाशी खेळताना सदा, दुसऱ्यांच्या विचारात बुडालो
सुखाच्या कैक वाटा शोधल्या तरी ना मिळाले
दुःखाच्या विळख्यात अडकून ग्रह सारे फिरले
दोष ना कुणाचा 'नी' नाही कोणाला द्यायचं
भाग्याचा भाग सगळा, मिळेल तेवढं घ्यायचं
मलाही मन आहे माझे, मीच विसरून गेलो
जीवनाच्या या शाळेत पाठयपुस्तकंच न्यायला विसरलो
अभ्यास कशाचा करू आता, मी लेखणीचा झालो
आयुष्याची पाने उलगडत, स्व-जीवनपट लिहून गेलो
