STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तृष्णा

तृष्णा

1 min
188

तृष्णा भासे मानवाला

विविधच प्रकारची

कधी कुणाला भेटीची

तर कुणाला साथीची


किती वर्णावे प्रकार

तृष्णा प्रेमाची मायेची

असे वंचित मातेला

दशा त्याच्या दुर्भाग्याची


दूर असे प्रियकर

तृष्णा तिजला भेटीची

आस लागे अंतरासी

तगमग हो मनाची


तृष्णा जलाची मानवा

जीवनच होय जल

पाण्यासाठी दाही दिशा

चाले कांता हतबल


तृष्णा नको व्यसनाची

घात करी शरीराचा

तृष्णा नकोच पैशाची

घात करी जीवनाचा


दोन वेळ दे भोजन

देई तांब्याभर पाणी

देई पोटापुरतेच

नको तृष्णा मनमानी


तृष्णेनेच अवाजवी

झाला मानव दानव

आता तरी हो सावध

जप रे मनू साकव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract