तृषार्त झाली व्यथा
तृषार्त झाली व्यथा
कोसळली वीज, आकाशातून
घन काळे दाटले
तृषार्त झाली व्यथा लोचनी
जल सारे आटले
आले वादळ तरू कोसळले
तुटल्या शाखा वन गहिवरले
आक्रोशातच बुडली धरती
पान पान फाटले
तृषार्त झाली व्यथा लोचनी
जल सारे आटले
फसली पक्षीण, रुसले घरटे
का दैवाचे फासे उलटे
पिल्ले उपाशी पोटी फिरती
पंख कुणी छाटले
तृषार्त झाली व्यथा लोचनी
जल सारे आटले
तेल सांडता समई मधले
शुष्क वातीला जीवन कुठले?
ज्योत विझूनिया गेली
त्यांनी काळोखच वाटले
तृषार्त झाली व्यथा लोचनी
जल सारे आटले
