STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

तृप्त करी बालके

तृप्त करी बालके

1 min
250

हट्ट काय करणार?

भुकेलेली छोटी बाळे!!

भेळ दिसताच झाले

हात पुढे भुकेलेले!!   (१)


भेळ दिसता खाण्यास

आशा चमके नयनी

भूक उसळे पोटात

भ्रांत भूकेची जननी   (२)


खायलाही महागली!!

अशी कशी दैना झाली?

स्वातंत्र्याची कैक वर्षे

आज उलटूनी गेली!!   (३)


मुलभूत गरजांना

असे का व्हावे पारखे?

अन्नासाठी दाही दिशा

असे ईश्वर फिरवे!!    (४)


आज स्वातंत्र्याच्या दिनी

माते तुजला वंदिते

तृप्त बालकांनी व्हावे

मनोमनी मी प्रार्थिते   (५)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract