तराणे
तराणे
अजानता जाणता तू
छेडले तराणे
सप्तसुरांच्या या स्वरावर
होऊन मी गाणे
तू शाम मी राधा
तुला भेटण्या
सदा मी शोधशी बहाणे. ..
मुक्त हासरी बासरी
का लावते वेड ना नारे
तालसुरांच्या ठेक्यावर
शब्दांशी तू खेळणारे ....
राग भैरवीच्या ठूमक्यावर
जुळून आले गाणे
छम छम पैजनाच्या
नादावर पाय नाचणारे...
टाळ मृदंगाच्या तालावर
ओवीत मी दंगणारे
अजाणता जाणता तू
छेडले तराणे
सप्तसुरांच्या या स्वरावर
होऊन मी गाणे..

