तोडू शृंखला संसर्गाची
तोडू शृंखला संसर्गाची
शृखलारूपात
पसरतो आहे,
विषाणू सर्वत्र
तो गाठतो आहे!
तोडू शृंखला ती
त्वचा संपर्काची,
तोडू शृंखला ती
रोग संसर्गाची!
थुवूयात हात
स्वच्छ, विषाणूचे,
पाळूयात मंत्र
ते स्वचछतेचे!
वापरूया मास्क
राहू या घरीच,
थोपवू संसर्ग
घराच्या दारीच!
ठेऊया अंतरे
सुरक्षिततेची,
घेऊया लस ती
प्रतिबंधतेची!
टाळूयात वृत्त
खोट्या अफवेचे,
करूयात नष्ट
राज्य विषाणूचे!
लावूयात झाडं
ती प्राणवायूंची,
राखूयात निगा
पर्यावरणाची!!
