STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Romance

4  

Sarita Sawant Bhosale

Romance

तो येतो तेव्हा

तो येतो तेव्हा

1 min
253

तो येतोच सोबत तुझ्या आठवणींना घेऊन

मग मन मात्र थाऱ्यावर राहत नाही

हास्याची बहर आसवांची लहर

दोन्हींचा मिलाप काही थांबत नाही

तो येतो सोबत तुला मला चिंब भिजवतो

जवळ नसू तरी दुराव्यात आपण बिलगतो

बेभान झालेलं मन आणि तुझ्यावर खिळलेले नयन

काही आवरता आवरत नाही

तो येतो मातीचा सुगंध घेऊन

सोबत तुझा सहवास पांघरून वेडावलेला जीव

गुंतल्याशिवाय मात्र राहत नाही

दाटून आलेल्या भावना आणि अनामिक ओढ

बरसल्याशिवाय काही राहत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance