तो पहिला पाऊस..
तो पहिला पाऊस..


बेधुंद बरसणारा तो पहिलाच पाऊस
ग्रीष्मात तापलेल्या तहानलेल्या मातीवर
अलगद फुंकर घालून चिंब भिजवणारा
तो पहिला पाऊस
मातीला घट्ट बिलगून एक होणारा
त्या मिलनाचा सुगंध सर्वदूर परवणारा
तो पहिला पाऊस
खिडकीला चिटकवून बसवणारा
थंड हवेत गरम चहाची चव फुलावरा
उगाच मनाला वेड लावणारा
तो पहिला पाऊस
ढगांच्या गर्दीत तिची शोधाशोध
करायला भाग पाडणारा
आणि ते पहिलं प्रेम पुन्हा
आठवून देणारा
तोच हा पहिला पाऊस
तिचा नको नको झालेल्या
पण ओठांवर हसू फुलवणाऱ्या
आठवणींना चाहूल घालणारा
तो पहिला पाऊस
डोळ्यातील आसव लपवणारा
तो पहिला पाऊस..