प्रेम काय फक्त ...
प्रेम काय फक्त ...

प्रेम काय फक्त I love you म्हणलं तरच नसत..
सकाळी उठून तयार केलेल्या डब्यात पण ते असत
त्यांचा आवडीचा पदार्थ करण्यात पण ते असत
संध्याकाळी ते परतन्या आधीच दारात वाट बघण्यात ते असत..
प्रेम काय फक्त I love you म्हणलं तरच नसत..
Lunch break नंतर येणाऱ्या जेवलात का sms मध्ये ते असत
भाजी आवडली का ह्या प्रश्नात पण प्रेम असतं
मीठ जास्त झालं तरी छान झाली म्हणून येणाऱ्या reply मध्ये पण असत..
प्रेम काय फक्त I love you म्हणलं तरच नसत
दिवसभराच्या कामानंतर हातात येणाऱ्या पाण्याच्या ग्लासात प्रेम असतं
एकमेकांसाठी सोसलेल्या त्रासात सुद्धा प्रेम असत.
प्रेम काय फक्त I love you म्हणलं तरच नसत
वटपौर्णिमेच्या उपवसात प्रेम असतं
वडाला बांधलेल्या धााग्यात पण ते असत..
प्रेम काय फक्त I love you म्हणलं तरच नसत