असं प्रेम एकदा तरी करावं
असं प्रेम एकदा तरी करावं


कुणावर तरी जीव ओवाळून टाकावा
कुणासाठी तरी मनाला वेड लागावं
असं प्रेम एकदा तरी करावं
रात्रीचा दिवस व्हावा
अन दिवसांची रात्र
रात्रांदिनीच भान देखील हरवून जावं
असं प्रेम एकदा तरी करावं
तिची वाट पाहताना आयुष्य छोट पडाव
तिचा आठवणीत रमताना
जन्माचं गुढ उकलाव
असं प्रेम एकदा तरी करावं
थरथरत्या पापण्यांचा बांध सुटावा
तिच्या स्मरणांनी वयाच्या सत्तरीत देखील
हृदयाचा ठोका चुकवा
असं प्रेम एकदा तरी नक्की करावं