STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Romance

3  

.प्रमोद घाटोळ

Romance

तो पाऊस

तो पाऊस

1 min
339

येऊ दे तो पाऊस गं

चिंब चिंब होऊ

गीत पावसाचे सखे

दोघं मिळूनीया गाऊ


जाऊ दे गं उन्हाळा

या पिवळ्या उन्हाचा

चढू दे रंग सखे

प्रेम भावनेचा


विरह जाळतो तो

आंतरपाट मधीचा

देतो संकेत मात्र 

येणाऱ्या सुगीचा


मावळला सूर्य नभी

सांज येऊ लागली

कल्लोळ संपला सारा

चल गं जाऊ जागली


अंधारल्या चहू दिशा

गगनात चंद्र आला

येना गं जवळी जरा

सुटला गार गार वारा


येऊ लागला पाऊस गं

चल प्रेम गीत गाऊ

बरसू लागल्या सरी आता

चिंब चिंब होऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance