तो जीवलग
तो जीवलग
तो येतो कधी आठवणींच्या रुपात
तर कधी मातीचा मृद्गंध घेऊन
हिरवी स्वप्ने लेवून सृष्टी अवधी
साज शृंगारात गेली गुंगून
कोण म्हणती त्याला पाऊस
जो देती नवा विश्वास आस
नवचेतना अशी फुलवितो
निर्मितो मोत्यांची नवी रास
