STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

तकदीराच्या गोष्टी

तकदीराच्या गोष्टी

1 min
155


लिहिले होते कोर्‍या पाटीवर नशिबाचे अक्षर

सुकून गेले पावसाविना माझे सारे वावर

तहान होती मला लागली उन्हाळ्यातल्या दिवशी

कसे प्यायचे खारट पाणी धावत आला सागर


घाम गाळुनी थेंब थेंब मी शुद्ध मिळवले पाणी

तहानल्यावर ऐन दुपारी उन्हात फुटली घागर

ठेच लागली होती माझ्या पुढच्यास किती मोठी

तरी मारली कशी काय मी त्या दगडाला ठोकर


स्वभाव माझा किती निराळा कुणास कळला नाही

चेंगरूनही बघ ऊसाला निघते आहे साखर

निसर्गास मी मागत नाही फार मोठे काही

दोन सांजची मिळू दे मला फक्त पुरेशी भाकर


समानतेचे भाषण देतो नेता मोठा खोटा

पाय धुण्याला सुध्दा त्याला आहेत दहा नोकर

ओठात हसू नयनी आसू जगायचे मी कैसे

हसून सारे दु:ख झेलतो सर्कशीतला जोकर


आई बाबा वृद्धाश्रमात घरात राजा राणी

मुलास देतो धडा आपल्या ‘कर मोठ्यांचा आदर’



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy