तिला कळणार आहे का (गझल)
तिला कळणार आहे का (गझल)


नशेने दु:ख विरहाचे तिला कळणार आहे का
तुझ्या पाहून अश्रूंना कुणी रडणार आहे का
ऋतू आहे वसंताचा कशाला पानझड आता
अशी पानेच रुसल्याने कळी खुलणार आहे का
नको गगनात शोधू तू तुझ्या स्वप्नातला तारा
निखळलेला तुला तारा पुन्हा दिसणार आहे का
मनाला सावरावे तू कधी अपघात घडल्यावर
घड्याळाचा कधी काटा उलट फिरणार आहे का
जरा हासून घेना तू तुझ्या रोखून अश्रूंना
तुझ्या डोळ्यातले अश्रू कुणी पुसणार आहे का