STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

तीला काही सांगायचे

तीला काही सांगायचे

1 min
117

घरासाठी ती राबते

नाही आराम तिजला

तिला काही सांगायचे

कधी कळणार तुला  १


सदा विचार सर्वांचा

करी ती काबाडकष्ट

तिला काही सांगायचे

समजावे भाव स्पष्ट  २


मातृभाव दैवी तिचा

अलौकिक आहे खरा

तिला काही सांगायचे

भाव तिचा जाणा जरा  ३


सखी असते राजाची

प्रेम अत्यंत करते

तिला काही सांगायचे

हेच गुपित असते   ४


लेक लाडकी पित्याची

होते सासरची सून

तिला काही सांगायचे

सांगे मी मनापासून  ५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational