ती..
ती..
ती म्हणून जगतांना खूप आव्हान पेलावी लागतात..
तरीही आपला समाज,आजही "ती" ची सावली काळ्या पाण्यात पाहतात..
"ती" आहे म्हणून जीवन समृद्ध आहे..
"ती"च्या विना जगणं म्हणजे मानवी जीवनाला शाप आहे..
"ती"च्या मुळे सृष्टीचा अखंड विस्तार आहे..
हे कटू सत्य स्वीकारण समाजासाठी अवघड आहे..
एका, यशस्वी पुरुषाच्या यशात "ती" चा मोलाचा वाटा आहे..
केवळ "ती" च्याकडे तो मार्तृत्वाचा अखंड साठा आहे..
"ती" च्या विना मानवी जीवनाचा फक्त अंत आहे ..
"ती" च्या मुळे जगात आजवर प्रेम जिवंत् आहे..
"ती" ची महिमा अपार आहे..
"ती" म्हणून जगण्यात जीवनाच सार आहे..
