STORYMIRROR

Priyanka Shinde Jagtap

Romance

4  

Priyanka Shinde Jagtap

Romance

ती...

ती...

1 min
288

रात्र सरली पौर्णिमेची

पसरला काळोख आकाशी, 

तिची भयाण किंकाळी

निःस्तब्ध गावच्या वेशी ॥१॥


पडक्या त्या विहिरीमध्ये

तिने टाकली होती उडी,

आता झाली ती आत्मा

त्या सूडभावनेच्या आडी ॥२॥


दागिन्यांनी मढलेली ती

सफेद साडीतली सावली,

आभास की आहे सत्य?

अन् नकळत समोर आली ॥३॥


तिचा तो विद्रूप अवतार

पाहून झाली घाबरगुंडी,

जी सुसाट धाव ठोकली

लावली घट्ट घराची कडी ॥४॥


सरता सरता सरली रात्र

स्वप्न होते ते हे कळले,

आरशात मग न्याहाळता

तिचे रुपडे त्यात दिसले ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance