ती येत आहे..
ती येत आहे..


चुकवून सारे जगाचे पहारे, ती येत आहे
घेऊन हाती नभातील तारे, ती येत आहे
करतो विनंती मला पाहणार्या, सार्या घनांना
ह्या चंद्र तार्यांस झाकून घ्या रे, ती येत आहे
झाली जरी मौक्तिके आसवांची, मी न दुःखी
हृदयात आता फुलांचे उमाळे, ती येत आहे
मज रोखले गे किती सागरीच्या, या वादळांनी
दिसतात आता सुखाचे किनारे, ती येत आहे
हे सप्तसिंधू तुम्हा आर्जवे, आता ही जराशी
भेटीस वेड्या तुम्ही नाहवा रे, ती येत आहे