ती ,,, ती असते.......
ती ,,, ती असते.......
जिचे रूप अनेक असते
जिचा एक अरुंद इतिहास असतो
तर ती व्यक्ती असते तरी कोण ??
ती ती असते जी एक स्त्री असते.||ध्रु||
ती, ती असते ....
जी अनेक नात्यांनी गुंफलेली
एक मायेची वेल असते
जसे लाखो दिवे हवे असतात
काळा कुट्ट अंधार नाहिसा करायला
तशी ती एकटीच पुरेशी असते
चार भिंतीच्या घराच स्वर्ग करायला
तीच तर एका घरातील गृहिणी असते
ती ती असते..जी एक स्त्री असते||१||
ती, ती असते
जी नऊ महिने नऊ दिवस तिच्या
उदरात बाळाला जपून ठेवते
जी मायेच्या पदरा आळ
मायेन बाळाला स्तनपान करते
तीच तर एका बाळाची आई असते
ती ती असते.... जी एक स्त्री असते.||२||....
ती ,ती असते .....
जी जन्माला येताच चारी देशेला
खुळ - खुळ्याचा आवाज घुमू लागतो
ती येताच पाळणा सुद्धा हलू लागतो
सगळी कडे आनंदाची बरसात झाली
जन्माला एक गोड परी आली
तीच तर एका बाबांची लाडकी मुलगी असते
ती ती असते..जी एक स्त्री असते||३||
ती,ती असते
जी भावाच्या लाडाची राणी असते
तिच्या रुपात आई ची छवी असते
भावाच्या आयुष्यातील सर्वात जवळची
मैत्रीण ही फक्त तीच असते
तीच तर एका भावाची बहिण असते
ती ती असते....जी एक स्त्री असते..||४||
ती, ती असते....
जी तिच्या आयुष्यातील सर्व नाती,
मागे सोडून येते,
सासरची नाते जपता जपता,
तिचे सर्व आयुष्य जाते ,
आयुष्याच्या अवघड वाटेवर तिने
दिली तुझी नेहमी साथ
कोणत्याही प्रसंगाला सोडला नहीं तिने
तुझ्या हातातला हात , तुझ्या हातातला हात
तीच तर एका पती ची पत्नी असते
ती ती असते...जी एक स्त्री असते.||५||