ती ओलेती
ती ओलेती


दवात भिजल्या कळीसारखी
पडद्यामागे ती युवती
पानामागील फुलासारखी
मोहक भारी दिसली ती....1.
पदन्यास ते मयुरीपरी
बघत स्वतःला ओलेती
उभी राहिली आईन्यापुढती
बघता स्वतःला ओलेती....2.
पदर ओला ढळला खाली
आरशात का हसली ती
पडदा सरला वाऱ्याने अन्
हवी तशी मज दिसली ती....3.
बघून मला तर बावरली
वस्त्रे तर फिटली होती
मिटूनी घेतले डोळे मी
पापण्यात मग मिटली ती...4.