STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

ती लाजते तेव्हा...

ती लाजते तेव्हा...

1 min
151

ती लाजते तेव्हा

खूप छान दिसते

गालावरची खळी

आपसूक खुलते.....


मग काय तिच्याकडे

पाहताना हरवून जातो

चेहऱ्यावरचे तेज तिच्या

नयनी साठवत बसतो....


ती लाजते, सुंदर भासते

नयनी बाणही सोडते

माझा जीव आहेस तू

का एवढे घायाळ करते....


मनावर ताबा राहत नाही

काय तुझी नखरेल चाल

हसणं तुझं खूप,खूप गोड 

काय तुझे काळेभोर बाल...


प्रेमाने मी पाहतो तुला

मनातच प्रीत सडा शिंपतो

अखंड तुझ्या धुंदीत राहतो

तुझ्या अवतीभवतीच रमतो....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance