STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Abstract

4  

Sakharam Aachrekar

Abstract

ती कहाणी

ती कहाणी

1 min
185

सागरी लाटेसवे या, झुंजणारी ती कहाणी 

अन किनारी पोचताना, भंगणारी ती कहाणी 


सांगते मज रम्यता ती, दो मनांच्या जीवनाची 

चालता क्षितिजाकडे त्या, भेटणारी ती कहाणी


शब्द काही बोलताना, अंतराळी दूर गेले 

ते तुला माझ्या रुपाने, सांगणारी ती कहाणी 


उसळता दर्या मनी, भारावलेल्या त्या क्षणांचा 

आसवांनी आपल्या, ओथंबणारी ती कहाणी 


सांगते मजला तुझ्या, नजरेतले हे भाव काही 

रोज वेड्या भूतकाळी, गुंतणारी ती कहाणी 


अधर हे अधरांस मिळता, प्रीत वर्षा सांडते जी 

आपल्या या प्रीतरंगी, रंगणारी ती कहाणी 


अंत ना ज्याच्या युगाला, भासते मजला अशी का

त्या तुझ्या हसण्यात वेड्या, जन्मणारी ती कहाणी


नित्य मी वाचीन आता, लोचनी दोन्ही तुझ्या त्या 

या तुझ्या प्रीतीस माझी, जिंकणारी ती कहाणी 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract