ती अन् तो
ती अन् तो
ती वीज लखलखणारी
तो शांत स्थिर ध्रुवतारा
ती झंझावात वाऱ्याचा
तो मृद्गंध दरवळणारा...
थकून कधीतरी जेव्हा
ती होई मलूल जराशी
हळूच ओथंबून भावनांनी
कवटाळे तो उराशी...
आश्वासक स्पर्श त्याचा
वाटे तिला विसावा
ती ऊब मिठीची त्याच्या
तिचा अमूल्य ठेवा

