STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

ती आणि मी

ती आणि मी

1 min
358

ओठांनाही तिच्या आता उसंत कुठे

नाव माझेच ती सदा गुणगुणत आहे


नको ती आश्वासने खोटी नात्यात आपल्या

तुझ्या आठवणीच मनात घर वसत आहे


अश्रूंचेही ती कोवळी फुले बनली आता

तुला बिलगून बिचारी जास्तच उमलत आहे


हात घेतला तिचा काल हातात माझ्या 

ती फक्त गुलाबी गालात हसत आहे


नजरेची भाषा बोलू तरी कशी मी तिला

विषय टाळण्याची सवय तिला अवगत आहे


स्वप्न राहील अधुरे की होईल पूर्ण आता

स्वीकार प्रेमाचा फक्त तुझ्या मनात आहे


कधीतरी भेटशील पुन्हा या आयुष्यात

वाट पुन्हा तुझी या वाटेवर बघत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance