STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance

4  

Ganesh G Shivlad

Romance

तिच्या विरही डोळ्यात

तिच्या विरही डोळ्यात

1 min
253

लाल ओठांवर तिच्या, मी नाव माझे शोधतो आहे,

तिच्या विरही डोळ्यात मी, अस्तित्व माझे शोधतो आहे..!


काळ्या केसात तिच्या, मी गाव माझा शोधतो आहे,

तिच्या जरतारी पदरात मी, पत्ता माझा शोधतो आहे..!


मनाच्या गाभाऱ्यात तिच्या, मी घर माझे शोधतो आहे,

तिच्या हृदयी अंतरी मी, वास्तव्य माझे शोधतो आहे..!


रेशमी मिठीत तिच्या, मी पहाट माझी शोधतो आहे,

तिच्या मखमली अधरात मी, रात्र माझी शोधतो आहे..!


नितळ कांतीवर तिच्या, मी तीळ तीळ शोधतो आहे,

तिच्या हसऱ्या गालावर मी, गोड खळी शोधतो आहे..!


गंधित देहात तिच्या, मी धुंद कस्तुरी शोधतो आहे,

तिच्या रोम रोमात मी, मीच मला शोधतो आहे..!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance