STORYMIRROR

परेश पवार 'शिव'

Romance

4  

परेश पवार 'शिव'

Romance

तिचं निरागस हसणं

तिचं निरागस हसणं

1 min
387

तिचं निरागस हसणं..

आणि त्यात माझं फसणं..

तिच्या नयनीच्या तीराने,

थेट काळजात घुसणं..


वेड लागल्यागत माझं,

तिजकडे पाहत बसणं..

नजरेला भिडता नजर मात्र,

लाजून उगी आकसणं..


एकांती स्मरता तिजला,

एकट्या एकट्याने हसणं..

स्वप्नांमध्ये हमखासपणे,

फक्त तिचंच तिचं असणं..


जाग येताच जाणवणं,

तिचं आसपास नसणं..

खिडकीतून पाहत चंद्र,

हलकेच आसवं पुसणं..


कैसे विसरू सांगा मी,

तिचं असं मनावर ठसणं..?

मनी खोलवर रुजलेलं..

तिचं निरागस हसणं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance