तिची आठवण
तिची आठवण
तुला आठवते
आपली पहिली भेट
केवळ तुझ्यासाठी धावत पळत
गाठले होते चर्चगेट
तू उभी होतीस पावसात भिजत
मला पाहताच म्हणाली
ही काय यायची वेळ झाली
तुझ्या रागात प्रेम जाणवत होतं
काळजी मनापासून दिसत होती
आता मात्र हार घातलेल्या फोटो कडे बघून
येते मला तुझी खुप आठवण
तुझी आठवण हीच माझी साठवण
