तिचा पाठलाग करताना
तिचा पाठलाग करताना
तिचा पाठलाग करताना
हा बेदर्द पाऊस नेहमी मध्ये यायचा
माझ्या पेक्षा जास्त पाऊसचा
तिच्या जवळचा वाटायचा
मग मी आणि पाऊस
तिचा पाठलाग करत
तिच्या घरापर्यंत जायचो
पाऊस तिच्या घराच्या दारात
जाऊन थांबायचा
मी मात्र कुठतरी लांब उभा असायचो
पाऊस तिच्या घराच्या खिडकीवर
धो धो कोसळत रहायचा
उत्साहान ती खिडकीतून
त्या पावसाला पहात बसायची
मी मात्र लांबून त्या खिडकीकडे
पहात अखंड पावसात भिजत असायचो

