STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

1  

Vijay Sanap

Tragedy

थैमान पुराचे

थैमान पुराचे

1 min
572

थैमान घातले पावसाने

जणू काही आभाळ फाटले

जलमय झाली सारी सृष्टी

मेघ आकाशात दाटले ।।

हाहाकार माजविला पुराने

पाण्याने सोडली नदीची साथ

जनजीवन झाले विस्कळीत

कोठे मिळेना मदतीचा हात ।।

थैमान पाहून महापूराचे

हंबरती गोठ्यात गायी वासरे

विझली चुहूल भिजला संसार

टाहो फोडती पाण्यात लेकरे ।।

कृष्णा,पंचगंगा नदी पाण्याने

धोक्याची पातळी ओलांडली

या भयाण संकटात अडकली

कोल्हापूर आणि सांगली ।।

कोठे बसलास दडून देवा

डोळ्यासमोर दिसतं मरण

महापुरानं वेढा घातलाय

कसं रचावं आम्ही सरण ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy