STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance

थांबला रजनीश, मधुर प्रणयात

थांबला रजनीश, मधुर प्रणयात

1 min
28.5K


पाहूनी मला लाजली क्षणात

कळले मला, झुकल्या नयनात

खुलली चंद्र्प्रभा, सौंर्दय मनात

थांबला रजनीश, मधुर प्रणयात (१)


गमली अबोली, टिपुर चांदण्यात

स्पर्शीत तरुस, बेहोश यौवनात

विस्मरण घटिकांचे, मदमस्त मदनास

थांबला रजनीश, मधुर प्रणयात (२)


वेढले बाहुपाश, आलिंगण्या रतीस

कल्लौळ भावनांचा, लाजर्‍या मनात

विलगली लज्जा, खुल्या अंगणात

थांबला रजनीश, मधुर प्रणयात (३)


भरले प्रेमप्याले, संतुष्टी दोघांस

आलिंगने अनेक, किर्रर्र वनात

भयमुक्त वनिता, निशब्द प्रेमात

थांबला रजनीश, मधुर प्रणयात (४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance