STORYMIRROR

Punaji Kotrange

Tragedy

3  

Punaji Kotrange

Tragedy

तडजोड

तडजोड

1 min
167

अरे संसार करता करता

करावी त्यात तडजोड

नाही घेतली मागे हार; तर

होते संसाराची काडीमोड


माझेच ऐका असे बोलणे

हेच तर आयुष्याची वाटणी

कधी कधी आयुष्यात प्रसंगतः

घ्यावी लागते कलाटणी


येतो नात्यात दुरावा तरी

घालत रहावे खतपाणी

परिस्थिती बघता स्वतःच

राहावे शहाणपणा विसरुनी


संसार म्हटले तर सुख मिळेलच

नाही याची थोडीशीही शास्वती 

शिकावे लागते जिवनाचे मुलमंत्र

यात घेऊनी दुःखाला सोबती


तडजोड हाच जगण्याचा

असे जिवनातील खरा मार्ग

घरदार पालथा करण्यापेक्षा

जिंकावे यानेच आपले स्वर्ग...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy