STORYMIRROR

Swati Sawant

Inspirational

4  

Swati Sawant

Inspirational

ताईचा लहान भाऊ

ताईचा लहान भाऊ

1 min
383


ताईचा पाठीवर हात त्याच्या,

लहानग्या भावाचं स्वप्नं सजवायचं,

कधी खेळात हरवलेलं,

कधी अभ्यासात फसलेलं।


आवाज त्याचा गोड गोजिरवाणा,

ताईला तो वाटतो जणू देवाचं गाणं,

अश्रू त्याचे ताईनं टिपलेले,

मंद हसत दुःख झेललेले।


त्याच्यासाठी झाली दुनिया मोठी,

ताईचं प्रेम त्याच्यासाठीच ओठी,

कधी भांडणं, कधी गोड बोल,

ताई-भावाचं नातं अतूट धागा गोल।


लहान भावाची नजरेत उत्सुकता,

ताईच्या हातात जीवनाची दिशा,

सर्वस्व तिचं त्याच्यासाठी आहे,

ताईच्या प्रेमात तो रमतोय जणू स्वर्ग आहे।


कधी संकट आलं, ताई धावते आधी,

त्याचं हसू म्हणजे तिची खरा  साथी 

ताई-भावाचं नातं इतकं सुंदर,

आयुष्यभर टिकणारं l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational