तो पाऊस
तो पाऊस
1 min
5
आकाशातून अवतरतो तो पाऊस,
धरतीच्या कुशीत झरतो तो पाऊस ।
थेंबांच्या ओघात गुपिते सांगतो तो पाऊस,
प्रकृतीच्या गोड मिठीत साद घालतो तो पाऊस।
निसर्गाच्या सानिध्यात नवलाईचा सोहळा रंगवतो तो पाऊस,
जणू आनंदाचा झरा असा तो पाऊस,
मातीच्या या सुगंधात ओढ लावतो तो पाऊस,
अन् प्रत्येक थेंबात साठलेल्या प्रेमाची उधळण करतो तो पाऊस।
कधी येतो तो गाण्यात, कधी नाचतो रिमझिम
असा तो पाऊस
