स्वरलता
स्वरलता
अविरत सेवा केली, आयुष्यभर पूजले स्वरांना
करोडो मने जिंकलीत, गुणगुणायला शिकवलं लेकरांना
केवढं ते काम मोठं, तेवढाच राहिला शेवटपर्यंत साधेपणा
खऱ्याची किंमत माहीत होती, पण दिसून आले निरोप घेताना
भरभरून दिलंत रसिकांना, हिशोब कसलाच बाकी नाही
या अवनीवर याच्या नंतर, असा आवाज होने नाही
साऱ्या देशाचा होतात आभिमान, अशी कारकीर्द तुमची
नशीब जन्मलो या भूमीत, सतत तुम्हा ऐकायची इच्छा आमची
स्वरांनाही कळली त्यांची, खरी काय ती क्षमता
भारताची गाणंकोकिळा ती, साऱ्यांचि दीदी स्वरलता
