Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrudula Raje

Tragedy

4.5  

Mrudula Raje

Tragedy

स्वर्ग -सुख

स्वर्ग -सुख

1 min
735


स्वर्गसुख


बाटली मिळाली हातात, दारूची झिंग अहा चढली।

प्रेमात हिच्या कधी पडलो मी? ही किमया कधी घडली?॥

तृषार्त होते मन माझे , मज हवी होती प्रेयसी।

काॅलेजच्या मित्रांना मिळते, तशी गर्लफ्रेंड सुंदरशी॥


एक मिळाली, भासे मज जी रोज मधुबाला।

ती ही गेली सोडून, लावून घोर काळजाला॥

गेलो मग मी ' बार' मध्ये, अन् घेतली अगदी थोडी।

पण तुम्हां पामरा कशी कळावी , त्या स्वर्गसुखाची गोडी?॥


बाबांची एकच इच्छा, मी इंजिनियर व्हावे।

आई विनवी, " राजा, थोडे लक्ष अभ्यासातही द्यावे "॥

रोजरोजची कटकट, " च्यायला!विसरून जावे सारे!"

दोस्तांच्या संगतीत मनीं कसे फिरती भन्नाट वारे॥


हातात फिरतो पैसा खुळखुळ, येता पाॅकेटमनी।

यार - दोस्त खुणविती अशी मग संधी साधुनी॥

बैठक बसते मग यारांची, कोणी ' चकणा' ही काढी।

पण तुम्हां पामरा कशी कळावी , त्या स्वर्ग सुखाची गोडी?॥


कोणी घेतो बीयर, कोणी करी वाईनचे कौतुक।

व्हिस्कीचे भरताच ग्लास, लागती ओठाला आपसुक॥

शॅम्पेनची बाॅटल फोडता, वाढते पार्टीची रंगत।

एकच अट पण ह्यासाठी; हवी रंगिल्या दोस्तांची संगत॥


एखादी मैत्रीण मग मागते शाॅट टकिल्याचा।

उन्माद होई त्याक्षणी , जणू जग सारे जिंकल्याचा॥

हीच ' किक ' हवी जीवनामध्ये, ' झिंग' हवी थोडी।

पण तुम्हां पामरा कशी कळावी स्वर्गसुखाची गोडी?॥


तारुण्याची ही नवलाई , का जाऊ द्यायची व्यर्थ?।

' बाटली ' कधी ना हाती धरली, तर काय जीवना अर्थ?॥

पुन्हा, पुन्हा, हे दिवस न येतील; पांगतील मग मित्र।

" आजचा दिवस आज उपभोगा " हेच जीवनाचे सूत्र॥


सफेद, पिवळी, कधी सोनसळी, रिचवूया दारू ओठात।

डोक्यात शिरते मस्ती, पाय थिरकती, जेव्हा ही जाई पोटात॥

उत्तररात्री जरी होऊन 'ठांय' , पसरून पाय, ही गुंगी वाढवी थोडी।

पण तुम्हां पामरा कशी कळावी त्या स्वर्गसुखाची गोडी?॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy