STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

3  

Sushama Gangulwar

Tragedy

स्वप्नपरी

स्वप्नपरी

1 min
291


स्वप्नपरी म्हणता मला 

मग का गर्भातच मारता 

असं समाजाचं ऐकून 

पोटच्या गोळ्याला दूर का सारता....


जन्माला आल्यानंतर ही 

मुलगी म्हणून होते माझी विटंबना 

आई तू पण एक स्त्रीच आहेस 

माझ्या हक्कासाठी लढा दे ना....


शिकून सवरून स्वतःच्या 

पायावर मी उभी राहीन 

तुमचा वंशाचा दिवा बाहेर काढला 

तरी मी पणती होवून तुम्हाला साथ देईन...


आई कशाला पाहिजे गं? 

तुम्हाला असा वंशाचा दिवा 

जो कळतं झाल्यापासून फक्त 

हिस्सा घेण्यासाठी करतो दावा.....


देवाकडे प्रार्थना एवढीच कर गं आई 

तुझी स्वप्नपरी सुखरूप जन्मला यावी 

आई-वडिलांचे स्वप्न साकार करून 

उंच अशी गगन भरारी घ्यावी.......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy