STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

4  

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

स्वप्ने कागदी

स्वप्ने कागदी

1 min
22.8K

घोट निराशेचे आज डोळे मिटुनी प्यालो

स्वप्ने कागदी माझे चुरगाळूनी निघालो


आशा अपेक्षांचे ओझे उतरले जेव्हा,

दिशाहीन प्रवासाचा नादही सुटला तेव्हा


भावना ओठांवरच्या पोटात ठेवूनी आलो

स्वप्ने कागदी माझे चुरगाळूनी निघालो


बदफैली जमावात या एकांत वाटला जेव्हा

किलकिले दारही घट्ट लावले तेव्हा


मार्ग प्रवेशाचे सारे बंद करूनी आलो

स्वप्ने कागदी माझे चुरगाळूनी निघालो


असा नव्हतो कधीही हे आठवले जेव्हा

काळापूर्वीचे आकाश शोधले तेव्हा


स्वप्नांचे विमान उंच उडवूनी आलो

स्वप्ने कागदी माझे आकाशी सोडूनी निघालो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy