STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

4  

Sakharam Aachrekar

Romance

स्वप्नातल्या कळ्यांनो

स्वप्नातल्या कळ्यांनो

1 min
290

स्वप्नातल्या कळ्यांनो साथ एकदा, द्याल का मला

प्रीतपाकळ्यांनी माझ्या अवचित, भिजवाल का तिला


भिजताना ती चिंब चिंब, असेच राहो चांदणे

सांगाल एकदा कानी तिला, मजपाशीच आहे नांदणे

भिजताना ती अनामिक पकडेल हाती, कळी एक कोवळी

सांभाळून तुम्ही मजला, आणून द्याल तेवढी

वहीत माझ्या आठवणींच्या, मी सांभाळेन त्या फुला

प्रीतपाकळ्यांनी माझ्या अवचित, भिजवाल का तिला


घालून रांगोळी त्या फुलांची मग, खेळेल ती तयांशी

घेऊन ओंजळीत सुगंधा त्या, लावेल ती उराशी

रंगीत त्या सुगंधाचा, सुरू होईल डाव वेडा

विश्वासमोर अग्नीसमक्ष तिच्यासह मी, घेईन एकेक वेढा

सोहळ्यात त्या मम आयुष्याच्या हवाय, सुगंध तुमचा ओला

प्रीतपाकळ्यांनी माझ्या, सांगा पुन्हा भिजवाल ना तिला


तुमच्यासाथी या नीलांबरी, मागेन मी तिला

एक रात्र चोरून तुम्हाविना, भेटेन मी तिला

भिजवण्या त्या एकांती आम्हा परतून, याल ना पुन्हा

बहरलेला हा जन्म व्यर्थ, तुमच्या सुगंधाविना

स्वप्नातल्या कळ्यांनो सांगा, साथ तुमची लाभेल ना मला

प्रीतपाकळ्यांनी माझ्या पुन्हा पुन्हा, भिजवाल ना तिला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance