STORYMIRROR

Advik Gangurde

Children Comedy

2  

Advik Gangurde

Children Comedy

स्वप्नातला बंडुराजा...

स्वप्नातला बंडुराजा...

1 min
2.6K


एकदा बंडू झोपी गेला

अन एक कमाल झाली

आटपाट नगरात मिळाली

त्याला राजाची स्वारी

बंडू होऊनि मग राजा

ठोकी एकच ललकारी

वाघाची जशी ही डरकाळी

वाटे मग जाम भारी

आस्वाद घेई मिष्टान्नचा

घोड्यावरी सैर करी

एका चुटकीच्या इशाऱ्यावर

डोलते प्रजा सारी

ठेवता बोट तोंडावर

मुकी होई प्रजा बापुडी

झोपेतून बंडुस उठवत

आईने दोन दणके दिले

बंडूचे राजा स्वप्न

झपकन तुटून गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children