STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

स्वप्नातील भारत

स्वप्नातील भारत

1 min
866

स्वच्छ आणि सुंदर भारत

असेल स्वप्नातील भारत ।।धृ।।


रंक, राव नि महंत जोगी

सारे असावे सदा निरोगी

सुदृढ शक्तिमान भारत ।।१।।


नसतील कोणी भ्रष्टाचारी

बेईमान आणि अविचारी

सत्यनिष्ठ नि सच्चा भारत ।।२।।


शिकून सारे मोठे होतील

देशासाठी सज्ज असतील

सर्वक्षेत्री महान भारत ।।३।।


मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा

भेदाला इथे नसेल थारा

सदा सर्वदा एक भारत ।।४।।


आईवडिल देवासमान

हेच संस्कार, हेच शिक्षण

श्रेष्ठ संस्कृती श्रेष्ठ भारत ।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational