STORYMIRROR

Sanjeev Borkar

Tragedy

4  

Sanjeev Borkar

Tragedy

स्वप्न

स्वप्न

1 min
395

एक वाईट स्वप्न पुन्हा बघतो मी

होऊन पक्षी आकाशात उडतो मी


कधी मखमली वाळूत बनून मोती

किनाऱ्यावर निपचित पडतो मी


कधी हिरव्या रानाची असतो पायवाट

काळोखात उजेडाला शोधतो मी


कधी असतो दारिद्र्याच्या महालात

दिसताच भाकर ढसढसा रडतो मी


कधी लाचारी, बेकारीत गुंडाळलेला

स्वतःसाठी हीरो बनून पाहतो मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy