STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Fantasy

3  

Aniket Kirtiwar

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
4.8K


उठेल मग रोजचं सकाळी

सूर्यदर्शनाची राहील घाई?

उडत सुर्य सोनेरी पंखानी

औक्षवंत करेल माझ्या कपाळी


म्हणेल मला विसरून जात

क्रांतीची पेटवशील वात?


म्हणेल त्याला तुझ्या उजेडात

घडत आहेत जे व्यभिचार

तेच माझ्या वातीला

देईल का रे खरचं आधार


पण असं असूनही तो जगतो

निराश होतो तरी ही उगवतो

नाही नाही हेच विचार

माणुसकीला पुढे नेईल

पण शंका वाटते कां खरंच

स्वप्न हे पुर्ण होईल?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy