स्वप्न..!
स्वप्न..!
स्वप्न पडले मला
स्वप्नात सारे माझेच भेटले
म्हणाले
आता बर भेटलास..?
मी म्हंटलं
आज इतकंच
सांगण्यासाठी भेटलोय
तुमच्या स्वप्नात तुम्हाला
मी भेटणार आहे
झोप मोड होते
तेंव्हा काय होते हे सांगणार आहे....!
इतक्यात जाग आली
आणि म्हंटल
शब्द पाळायचा
हरिश्चंद्राचे अवतार आम्ही
आम्हाला दुसरा पर्यायच नाही
कुतूहल जागे झाले
म्हंटले सांगावे आठवणीने
गाठ पडली माझी तर
अवश्य सांगा मला...!
