स्वप्न सुंदरी माझी
स्वप्न सुंदरी माझी
या नयनांनी बाण सखे
नकोस मारुस या हृदयात
जखमांनी घायाळताना
नाव असे तुझेच मुखात
गुलाब पाकळ्यांच तुझ्या या
अलगद उघड बोलताना
प्रेमगीत गुलाबी झाले
तव ओठांतून येताना
गाल गोरे रेशमी मुलायम
तीळ साजिरा असे तयावर
हळूच यावे घ्यावे चुंबन
वाटत राही मम् हृदयास
चाफ्याची कळी कोवळी
खुलवी रुप मोहक जरी
एक मोत्याची नथ साजणी
हवीच होती तिथे तरी
सौंदर्याची राणी साजणी
तू लावण्याची खाणी
जीव माझा तुझ्यात गुंतला
तू स्वप्न सुंदरी माझी