STORYMIRROR

Sunita Barewar

Children

4  

Sunita Barewar

Children

स्वप्न सुंदर

स्वप्न सुंदर

1 min
397

पक्ष्यांची किलबिल, नद्यांचा खळखळाट

मोरांचा कलरव, ढगांचा गडगडाट

पहाट झुळुक थंडगार


इटुकले,पिटुकले ससे चार

शुभ्र बगळे नटले फार

खेळ लपंडाव रंगला तृणावर

मऊ मखमली गवतावर


चिमण्यांची चिव चिव

कावळ्यांची काव काव

भरली शाळा वडावर

अक्षरे गिरविले पानांवर


सुंदर सुंदर फुलांची बाग

लाल,पिवळी फुले छान

गात होते भ्रमर गान

गोड लकेर, सुमधुर तान


तबला वादन मेघांचा

 नर्तन चालू विजांचा

पाऊस गाई राग मल्हार

संगीत मैफल रंगली अंबरी खास 


देखिले मी आज स्वप्न

 अति सुंदर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children