दाद
दाद
1 min
366
दाद द्यावी नवोदितांना
कौतुक करावे मनापासूनी
प्रतिसाद मिळताच नवागतांना
जन्मे नवकाव्य ह्रदयातूनी
कोते मन असू नये
टिका केवळ करू नये
शोधू नयेत केवळ वर्म
जाणावित तुम्ही कवीचे मर्म
नवागत कविस असते माहित
भरपूर आहेत उणीव माझ्यात
तरीपण,सूज्ञ तुमच्यासारखे रसिकजन
करतील मजला बहुमोल मार्गदर्शन
मिळताच दाद कवीला
सुप्त समाधान मिळे मनाला
अंकुरती मग कल्पना नव्या नव्या
स्वप्न,भावना,समस्या सार्या सार्या
