STORYMIRROR

Sunita Barewar

Others

3  

Sunita Barewar

Others

चैत्र मास

चैत्र मास

1 min
193

मासात मास पहिला मास 

चैत्र मास 


ऋतू त्याचा वसंत 

चिरतरुण आसमंत 


सण, उत्सवांची रेलचेल 

शुभमुहूर्ताची मंगळवेळ 


कवींना कवित्व चैत्रात स्फूरे

काव्य गीतांचा फुलोरा झुले 


फळांचा राजा हापूस आंबा 

वाजत गाजत चैत्रात स्वागत 


तरु,वेली नवयौवनात 

मोगरा फुले अंगणात 


पांगरा,पळस लालेलाल 

चैत्रात गुलमोहर शोभे फार 


Rate this content
Log in