STORYMIRROR

Sunita Barewar

Others

4  

Sunita Barewar

Others

जबाबदारी तुजवरी

जबाबदारी तुजवरी

1 min
275

सान तू परी

जबाबदारी थोर तुजवरी

चिमुकल्या तुझ्या हातांनी 

झाड लाव एकतरी 


ना प्रगती ना विकास 

झाला पुरता र्‍हास

वृक्षतोड बेसुमार 

मानवाचा अति हव्यास 


पूर्वज पूजती वृक्ष 

होऊनी अति दक्ष 

आज वृक्षतोड भरमार 

पर्जन्य बेहाल 


हवा, पाणी शुद्ध 

ना मिळे वैद्य

प्राणवायू दुष्कर 

श्वास घेणे मुश्किल


प्राणवायू मस्त 

वृक्ष उधळतो स्वस्त 

विनामूल्य मिळतो मस्त 

म्हणून झाडे लावा खूप जास्त 


Rate this content
Log in